बालवि वाह थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न होत असले, कायद्याने त्यावर बंदी असली तरीदेखील ग्रामीण भागांमध्ये बालविवाह सर्रास होताना आढळतात. या भागांमधील कि शोरवयीन मुलं-मुलींसमोर शिक्षणाचा अभाव, बालविवाह, बालमजुरी, लहान वयात आलेली घराची जबाबदारी, बाळंतपणे असे अनेक प्रश्न आहेत. बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करतानाच आरोहन ज्यांची लहान वयात लग्नं झालेली आहेत, अशांसो बतही काम करते. आरोहनची आरोग्य समिती गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना नियमित भेट देत असते. अशाच एका भेटीदरम्यान प्रकल्प संपर्क अधिकारी वनिता खारपाडे यांची भेट जव्हारच्या सरसून या दुर्गम भागातील मोकाशीपाड्यात राहणाऱ्या दिय या १५-वर्षीय गरोदर मुलीशी झाली.
या भेटींदरम्यान आरोहनतर्फे गरोदर व बाळंतीण महिलांचे समुपदेशन केले जाते, ज्यामध्ये त्यांना सरकारी योजना, आरोग्य व पोषण आणि बाळंतपणानंतरच्या काळजीबद्दल माहिती देण्यात येते. त्यांना १०८ आणि १०२ सारख्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांबद्दल जागृत केले जाते. मात्र वनिता यांनी दियाला त्यांचा स्वतःचा वैयक्ति क मोबाईल क्रमांक देऊन ठेवला.
दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी जव्हार तालुक्यातील सारसून मोकाशीपाडा या दुर्ग म गावातील दिया नामक एका 14-15 वर्षे वयाच्या बालविवाह झालेल्या मातेने सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान एका बाळाला जन्म दिला. बाळंतपण घरीच झाले. माता अल्पवयीन असल्याने बाळ व बाळंतीन या दोघांचीही तब्येत गंभीर होती. गावातील आशा कर्मा चारी बाहेर असल्याने अंगणवाडी ताईला कळविण्यात आले. बाळ बाळंतीणीची गंभीर परिस्थिती बघून काय करावे ति लाही काही सुचेना. पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी 108, 102 नंबरच्या गाड्यांना फोन केले परंतु गाड्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. अखेर तिने आरोहन ची कार्यकर्ती वनिता खरपडे हिला फोन केला, वनिताने क्षणाचाही विलंब न करता जशी होती त्या अवस्थेत मोकाशीपाडा गाठला. प्रायव्हेट गाडीची व्यवस्था करून जामसर येथील प्राथमि क आरोग्य केंद्रात दाखल केले.
जन्मानंतर दोन तासाने बाळाच्या अंगावर काच फोड आले, त्यामुळे पेशंटला जव्हार येथे हलविण्यात आले, तेथे बाळावर उपचार सुरु केले, नवऱ्याचा दिवसभर पत्ताच नाही. सो बत फक्त आई. बाळ -बाळंतीला कपडे नव्हते वनिताने तिच्या घरी जाऊन कपडे आणून दिले. दरम्यान रक्तस्त्राव अधिक झाल्याने मातेची तब्येत गंभीर झाली. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजतां दोघांनांही नाशि कला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. पुढील दोन-तीन दि वस हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार मिळाल्याने बाळ-बाळंतीणीच्या तब्येतीत सुधारणा झाली. तिच्या जि वावरचा धोका टळला. या सर्व घटनाक्रमात वनिताने चोख भूमि का बजावली. घटनेचे गंभीर्य ओळखूनत्या वेळेत पोहचल्या नसत्या आणि योग्य उपचार मिळाले नसते तर बाळ-बाळंतीणीचा जीव धोक्यात येवू शकला असता. या गंभीर परिस्थिचीची तात्काळ दखल घेऊन वनि ताने समयसूचकता दाखवत ज्या संवेदनशीलतेने ही केस हातळाली त्याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच! तिच्या कार्याला सलाम !