Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

Tag: pada

AROEHAN

Barbarity behind a “marriage”

Marriage is said to be one of the happiest moments in a person’s life. Some call it a sacred bond. But this true story of a marriage is shocking showing the blackening of humanity. It mirrors the perverse mentality of exploiting and oppressing girls and women (especially tribals) in society by taking advantage of their poverty and helplessness.

This is the story of a 17-year-old minor girl from Katkari Wadi of Mokhada, a tribal-dominated taluka of Palghar district. 5 to 6 Kms from the Taluka location lies a village called Poshera. To the east of this village is Katkari Wadi with a population of around 600-700. It was reported that a minor girl named Abla (the name is changed) was being forced to marry in exchange for money and the girl was being pressured for it. A social worker from AROEHAN came to know about the situation. Realizing the seriousness of the incident, the activists of the organisation reached the village immediately. They met with the minor and her family. The reality of the situation was shocking.

AROEHAN ACTIVISTS INQUIRE THE SITUATION IN KATKARI WADI

It was reported that an unknown person from Chalisgaon-Nagar Deola in Jalgaon district has a connection with a middleman in the tribal community to take the advantage of the poverty and helplessness of tribes. The minor’s aunt revealed that the suspect gave the father Rs. 15,000 in exchange for marrying the girl to him and would give Rs. 50,000 more after the marriage. The father signed the affidavit for it. (This affidavit is available but we do not have a copy with us). The minor’s mother passed when she was young and was looked after by her aunt. The father’s financial condition is poor and is an alcoholic. He does not pay attention to the girl and agreed with the marriage proposal in exchange for money. None of the rites of pre-wedding took place, the girl did not even see the person once. To impress the daughter and the father, the person used to send photos of expensive clothes and sarees and pressured her to get married to him as soon as possible. The girl talked with the boy a couple of times on the phone. As the situation looked suspicious, the relatives told the mediator to make proper arrangements to see the boy. The broker instead told the father to go to the boy’s house and do the “Kumkum ceremony”. The father said they cannot have a such ceremony without the daughter. Upon insistence, both father and girl went to boy’s house but there were no people responsible for the ceremony present. The aunt became suspicious about the situation and asked the girl’s father to take a hard look at the situation. He thought about it and decided not to marry the girl.

After the rejection, the broker pressured the family to return the Rs. 15,000. The father and the daughter were shocked. They could not return the money as it was already spent. They reached out to AROEHAN and we gave them support. We asked them not to give him any money. The broker came to the village and AROEHAN’s activists had a conversation with him. The broker was warned not to pester the family anymore or there will be legal action against him. He publicly agreed to not ask for money again. Though the issue was resolved it brought attention to a bigger issue here. There’s a suspicion there is criminal activity possibly backed by a gang or individual to sell/traffick tribal girls in the name of marriage going on. Because we came to know from many people about the occurrence of such incidents in the area. 

According to them, every year in Jawhar and Mokhada many tribal girls go missing. A muffled discussion could be heard about it now and then. These incidents do not come forward due to the dire economic condition of the tribes, lack of awareness among people, and also issues like alcoholism play a role in it. It is said that parents of girls fall prey to the lure of a small amount of money and engage their daughters. Even if there is any sort of opposition, the parents sometimes take the culprit’s side as they have taken the money. They also get afraid of the brokers and the other party thinking they might harm the family or even murder them, and they don’t come forward with the issue. What’s more numbing is that the brokers who arrange such marriages to take advantage of poor people and minor girls are often from their own community and locality. Due to sheer unawareness and fragile conditions, sometimes parents don’t even realise their daughters are been taken advantage of and there is no question of anyone complaining. This terrible reality is not publicly read or recorded anywhere. Even after 75 years of independence tribals are making such bargains for their daughters and their wings are cut before they even get a chance to fly. What kind of freedom do we live in? It’s high time we look at such situations carefully and act now.

-Pradeep Khairkar
AROEHAN

                                                                                                                

AROEHAN

एका लग्नामागचे क्रौर्य …  !

खरं तर लग्न हा मनुष्याच्या  आयुष्यातील एक आनंददायी ठेवा म्हटला जातो. काही जण त्याला पवित्र बंधन असेही म्हणतात. पण मी आज ज्या लग्नाची सत्यकथा  सांगणार आहे ती संवेदनशील माणसाची मती गुंग करणारी  आहे, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आणि समाजातील मुली-महिलांच्या (विशेषत: आदिवासी) गरिबी व असाहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे  शोषण आणि दमन करण्याच्या विकृत मानसिकतेचा आरसा दाखवणारी आहे.

ही गोष्ट आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासीबहुल तालुक्याच्या कातकरी वाडीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची. तालुक्याच्या ठिकाणापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर पोशेरा हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेला साधारण ६००-७०० लोकसंख्या असणारी कातकरी वाडी आहे. या ठिकाणी  अबला नावाच्या (नाव काल्पनिक आहे) एका अल्पवयीन मुलीचे पैशाच्या मोबदल्यात जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला असून त्यासाठी मुलीवर दबाव टाकला जात असल्याची  माहिती ‘आरोहन’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीला मिळाली. तिने संस्थेच्या वरिष्ठांना येऊन ही माहिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून  संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब  ते गाव गाठले. आणि पीडित मुलीच्या वडिलांची, काकीची व मुलीची भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना जे वास्तव समोर आले ते अंगावर काटा आणणारे होते.

कातकरी येथील परिस्थितीची तपासणी करताना आरोहण

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव-नगर देवळा येथील एका अनोळखी व्यक्तीने आदिवासी समाजातीलच एका मध्यस्थ दलालाला  हाताशी धरून मुलीच्या व तिच्या वडिलांच्या गरिबीचा, अज्ञानाचा व असाहाय्यतेचा फायदा घेऊन मुलीस १५ हजार रुपये  देऊन व वडिलांस ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याची माहिती मुलीच्या  काकीने दिली. (हे प्रतिज्ञापत्र उपलब्ध होऊ शकले नाही, त्याची प्रत मुलीच्या नातेवाईकांकडे देण्यात आली नाही.) मुलीच्या आईचे  मुलगी लहान असतानाच निधन झाले असल्याने लहानपणापासून काकीनेच तिचा सांभाळ केला. वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने व व्यसन असल्याने मुलीकडे त्याचे लक्ष नव्हते. ५० हजाराच्या आमिषाने सुरुवातीला त्यानेही या लग्नास संमती दिली होती.  परंतु लग्नासाठी आवश्यक असणारे कोणतेही रीतीरिवाज पाळले गेले नव्हते. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला नव्हता. मुलीला व वडिलांना प्रभावित करण्यासाठी, नवरा मुलगा या मुलीच्या फोनवर बस्ता बांधल्याचे फोटो (भारी कपडे व साड्या, इ.) पाठवून लवकरात लवकर लग्न करण्याबाबत दबाव वाढवत होता. एक दोन वेळा मुलाशी फोनवरून संभाषणही करण्यात आले. हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने  मुलीच्या पाहण्याचा रीतसर कार्यक्रम करावा असे नातेवाईकांनी मध्यस्थाला सांगितले. परंतु  मध्यस्थाने फक्त वडिलांना ‘मुलाच्या घरी जाऊन कुंकू लावण्याचा कार्यक्रम करू’ असे सांगितले. वडिलांनी मुलीशिवाय असा कार्यक्रम कसा करता येईल? असा प्रश्न उपस्थित केला. अखेर वडिलांच्या आग्रहाखातर, हो -ना करत मुलगी व वडील मुलाच्या घरी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमासाठी गेले. तेथेही कार्यक्रमासाठी  कोणी जबाबदार माणसे नव्हती. या सगळ्या गडबडीमुळे मुलीच्या काकीला संशय आला. तिने तिच्या वडिलांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. अखेर विचारांती त्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला.  

 हा नकार मिळाल्यानंतर मध्यस्थ दलालाने मुलीकडे १५ हजार रुपये परत करण्याचा तगादा लावला. तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यामुळे मुलगी, तिचे वडील व काकी हवालदिल झाले होते. कारण पैसे तर खर्च झाले होते. आता पैसे आणायचे कुठून? या विवंचनेत ते पडले होते. अशा परिस्थितीत अडकलेल्या या कुटुंबाला ‘आरोहन’ने मानसिक धीर दिला. पैसे परत करण्याची काही गरज नाही असे सांगून ‘आरोहन’ तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. दरम्यानच्या काळात तो मध्यस्थही तेथे आला. त्याच्यावर आरोहनच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबती करून तो करीत असलेले काम किती समाजविघातक व बेकायदेशीर आहे, याची कडक समज दिली व यापुढे मुलीकडे किंवा तिच्या नातेवाईकांकडे परत पैशांची मागणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. मध्यस्थाने पुन्हा पैसे मागणार नसल्याचे सर्वांसमोर मान्य केले. येथे एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा कट उधळला गेला. तात्पुरता हा प्रश्न मिटल्याचे समाधान वाटले. परंतु वरवर दिसणारी लग्नाची ही घटना फक्त लाग्नापुरती मर्यादित नसून यामागे लग्नाच्या नावाखाली आदिवासी मुलींची विक्री / तस्करी करणारी टोळी किंवा व्यक्ती कार्यरत असावी असा संशय येण्यास पुरेसा वाव असल्याचे लक्षात आले. कारण अशाप्रकारच्या अनेक घटना या भागात घडल्या असल्याचे विविध लोकांकडून कळले.   

अधिक माहिती घेतली असता दरवर्षी जव्हार-मोखाडा या भागातील अनेक आदिवासी मुली बेपत्ता  झाल्याची दबक्या आवाजातील चर्चा ऐकावयास मिळाली. या घटना पुढे येत नाहीत कारण या भागातील आदिवासींची अतिशय दारुण आर्थिक परिस्थिती, अज्ञान व व्यसनाधीनता असल्याने मुलींचे पालक थोड्या पैशाच्या अमिषाला  बळी पडून अशा प्रकारचे व्यवहार करीत असल्याचे बोलले जाते. प्रकरण उघडकीस आले किंवा कोणी विरोध केला तर पालक  संबंधित गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहतात. याहूनही सुन्न करणारी  बाब म्हणजे, अशाप्रकारच्या असाहाय्य व गरीब मुलींना शोधून त्यांच्या लग्नाचे सौदे करणारे मध्यस्थ दलाल हे इथल्याच समाजातील व परिसरातील आहेत. अर्थात त्यांचीही गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांचाही अशा कामासाठी वापर करून घेतला जातो हे त्यांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे कोणी तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परिणामी या भयाण वास्तवाची जाहीर वाच्यता किंवा नोंद कुठेही होत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलींचे असे सौदे करावे लागत असतील आणि उमलण्याआधीच अशा कळ्या कुस्करल्या जात असतील तर आपण कोणत्या स्वातंत्र्यात राहतो ? याचा अंतर्मुख होवून विचार करण्याची व  शीघ्र कृती करण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटते.    

-प्रदीप खैरकर
आरोहन

Meeting-Jambhlvadi-750

जीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा

‘आरोहन’साठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. ‘आरोहन’ (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.

आरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.

मी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).

शेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.

परंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्‍या बाजूला – मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.

सरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले.

“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला?”

“मग तू काय उत्तर दिलंस?”

“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”

“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील? पेशंट चालू शकेल का?”

“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”

आम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”

ते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.

मी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.

“कुठे जातील हे लोक?” मी माधुरीला विचारले.

“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”

“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात?”

“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.

“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”

“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.

“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”

आमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणि‍वेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.

आम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.

विवेक पटवर्धन

Patient-Ambulance750

Life And Death At Shedyacha Pada

Working with Aroehan has been an eye opener for me. Actually, it delivers shocks when I witness the activities.

Aroehan is an NGO. In 2005-06, 169 children below the age of six died in Mokhada due to malnutrition. That led to formation of AROEHAN. It is striving to bring sustainable changes to the tribal communities. I got associated with Aroehan over the last two years.

With Madhuri, Ganesh (who work for Aroehan) and Sulabha, my wife, I went to Kurlod. It is a village consisting of many ‘pada’ or hamlets. Our vehicle took us to Pethecha Pada. Madhuri said that we had to walk to Shedyacha Pada where she had arranged meetings with the villagers. (More about our discussion with the villagers in another blog).

Shedyacha Pada is about two Kms away from Pethecha Pada, but you must cross a river. Pinjal River.

Pinjal-River

Presently the river does not have much water so one can cross it easily, jumping over the rocks. Then you climb up a tiny hill to Jambhul Vadi. Shedyacha Pada is a little further away. In the monsoon, both these hamlets get cut off completely from Pethecha Pada, putting the villagers’ life at risk in many ways.

We finished our meetings with people at Shedyacha Pada. Sarita and Meenakshi from Aroehan had arranged all meetings. We were walking back to cross the river when two persons approached us at Jambhul Vadi. They had some discussion with Madhuri and Sarita. They looked worried.

Madhuri and Sarita in discussion with Patient's relatives Madhuri and Sarita in discussion with Patient’s relatives

 

“A person is very sick. He must be taken to Hospital immediately. They were asking if he can be taken in our vehicle.”

“What did you say?”

“Yes, I said. If somebody is critically ill, there is no choice.”

“How will they cross the river? Can the patient walk?”

“They will carry him in a hammock. They do it – I mean they have to do it often. Sad. There is no way out!”

We crossed the river. And walked a few steps when Madhuri looked back and said “Look, they are already on the way.”

I turned back. They were crossing the river. It had taken me good time to cross it, balancing my way on the rocks. They crossed it as if it was as smooth as a runway! They walked incredibly fast with a fifty-kilo patient cuddled in their hammock! And barefoot!!

Carrying Patient in a Hammock across Pinjal River Carrying Patient in a Hammock across Pinjal River

I reached for my mobile and shot the video.

“Where will they go?” I asked Madhuri.

“There is a hospital about twenty Kms away. Our vehicle will take him there and then it will return to pick us up.”

“What happens when the river is in spate during the monsoon?”

“HE decides if the patient must survive or die. No help is available.” She pointed finger to the sky.

“A PHC (Primary Health Centre) unit is sanctioned for us. Since 2014. But it has not come up.” A villager said.

“It will come up soon. We must not lose hope,” another said.

“Till then this river will decide the life and death issues” the villager said.

I was feeling relieved that our vehicle was available for the patient. That it was available was just a coincidence.

We walked our way to the Pada. No word uttered. Feeling helpless. And powerless.

8

Towards good governance

Towards good governance – collaborative efforts of pada samiti in Wanganpada, Dahanu